in

‘शहजादा’ मध्ये दिसणार कार्तिक आर्यन आणि कृति सेनन

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा करत आहे. आता त्याने रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’ या चित्रपटाची घोषणा केली असून या वर्षातील कार्तिकचा हा तिसरा चित्रपट आहे. आणि या चित्रपटावर तो सध्या काम करत आहे.

यापूर्वी कार्तिकने अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ चित्रपटातील ‘बुट्‌टा बोम्मा’ या गाण्यावरील डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याने ‘शहजादा’ची अनाउन्समेंट करत चाहत्यांमधील उत्सुकता वाढविली आहे. या चित्रपटात ‘लुका छुपी’मधील त्याची सहकलाकार कृति सेननसोबतची त्यांची जोडी पुन्हा सोबत झळकणार आहे.

कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबत त्याने पोस्ट लिहिली की, ‘शहजादा, या जगातील सर्वात गरीब प्रिन्स.’ या चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावलही मुख्य भूमिका साकारत आहे.

याचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी स्क्रीनवर धडकणार आहे.वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिककडे अनेक चित्रपटांची रांग लागली असून तो बॅक-टू-बॅक चित्रपटांची घोषणा करत आहे. सध्या त्याच्याकडे ‘धमाका’, ‘भूलभुलैया-2′ ‘फ्रेडी’ आणि ‘शहजादा’ यासारखे बिग बजेट चित्रपट आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्टोबर महिन्यात वसईतील पक्षप्रेमींसाठी पर्वणी

२९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू