in

केजरीवालांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला !

संपूर्ण देश महामारीचा सामना करत असतानाच केंद्र सरकार व दिल्ली सरकार दरम्यान वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात केंद्रीयमंत्र्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र देखील पाठवले आहे.

केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचे म्हणणे आहे की, मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवाल यांची पत्रकारपरिषद पाहत होतो, त्यांच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या दोन ध्वजांमधील पांढऱ्या रंगावर हिरवी पट्टी वाढवली गेली आहे. मी यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे, मी उपराज्यपालांना देखील पत्राची प्रत पाठवली आहे.

पत्रात केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल म्हणतात, अरविंद केंजरीवाल यांच्या पत्रकारपरिषदेत पाठीमागे जे दोन तिरंगा ध्वज लावलेले असतात, त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा भाग सोडून हिरव्या रंगाचा भाग वाढवण्यात आलेला आहे. यामध्ये गृहमंत्रालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

प्रल्हाद सिंह पटेल यांनी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मागणी केली आहे की, त्यांनी यात सुधारणा करावी. याचबरोबर त्यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांना देखील पत्र पाठवून याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिद्धार्थने पोस्ट केले आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो

महेश मांजरेकर दिग्दर्शित “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!