in ,

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आता केजरीवालांचे पंतप्रधानांना पत्र

देशभरात कोरोनाने पुन्हा आपले डोकेवर काढले आहे. अशातच मुंबई बरोबरच दिल्‍लीतील कोरोना संसर्गाची परिस्‍थिती अत्‍यंत चिंताजनक आहे. रुग्‍णांसाठी बेड, ऑक्‍सिजन सिलिंडरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे दिल्‍लीतील तात्‍काळ ७ ते १० हजार बेड केवळ कोरोना रुग्‍णांसाठी राखीव ठेवण्‍यात यावे, तसेच ऑक्‍सिजन सिलिंडरही पुरविण्‍यात यावेत, अशी मागणी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्‍दारे केली आहे.

केजरीवालांनी पत्रात म्‍हटले आहे की, मागील १२ दिवसांमध्‍ये दिल्‍लील कोरोना रुग्‍णवाढीची टक्‍केवारी ८ वरुन १६.६९ इतकी झाली आहे. संपूर्ण दिल्‍लीत अति दक्षता विभागात केवळ १०० बेडच उपलब्‍ध आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्‍या पाहता कमीतकमी सात हजार बेडची आवश्‍यकता आहे. तसेच ऑक्‍सिजन सिलिंडरचाही तुडवडा आहे. तत्‍काळ ऑक्‍सिजनची सुविधा पुरविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. मागील २४ तासांमध्‍ये २४ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण आढळले आहेत. पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची टक्‍केवारी ३० टक्‍के झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ही टक्‍केवारी २४ इतकी होती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीमध्ये चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये आग

मनमोहन सिंगांनी सरकारला दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले