in

७०० वर्षांची परंपरा खंडीत; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खापरा जत्रोत्सव रद्द

समीर म्हाडेश्वर | गेल्या कित्येक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारूर येथे साजरी करण्यात येणारी खापरा जत्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ७०० वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या नारूर गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावांमध्ये एक वर्ष आड खापरा जत्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो.पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे हा जत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

गेली ७०० वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक इतर राज्यातुन लाखो भाविक भक्त येतात.हा उत्सव दोन दिवसांचा असतो.पण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये असल्याने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक नारकर यांनी घरातच राहुन खापरा देवाला नमस्कार करावा असे आवाहन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सर्वाधिक गोल्समध्ये सुनील छेत्रीने मेस्सीलाही टाकलं मागे

संग्रहित छायाचित्र

Mucormycosis | नाशकात काळ्या बुरशीमुळे झाडांची कत्तल…