in

दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा रद्द

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा भाविकांविना होणार होती. केवळ २१ मानकर्यांच्या उपस्थितीत यात्रेस परवानगी देण्यात आली होती. पण आज ज्योतिबा देवालयातील पाच मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे आजची होणारी जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.

आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मानकरी यांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच मानकरी पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे प्रशासनाने आजची होणारी यात्रा रद्द केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी माध्यमांना दिली आहे तसंच भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने दख्खनच्या राजाचे दर्शन घ्यावं असं आवाहनही त्यांनी केला आहे. दरम्यान दरम्यान जोतिबा डोंगरा वरती संचारबंदी सदृश्य परिस्थिती असून पोलिसांनी डोंगरावरती एकही भाविक दाखल होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर?

West Bengal Election | कोरोना संकटात पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान