in

कोल्हापुरचे पाटील ओबीसी नेत्यांना धमकावतात

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना आमच्या ओबीसी नेत्यांवर काही लोकांनी आगपाखड सुरु केली असून कोल्हापूरच्या पाटलांनी आम्हाला धमकी दिली आहे,’ असा गंभीर आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यात राजकारण रंगलं आहे. आरक्षणावरुन संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

आरक्षणाचा प्रश्न धमकीनं नाही तर चर्चेना सुटेल, त्यामुळं धमकी न देता चर्चा करुन प्रश्न सोडवावा,’ असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसंच, धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असून न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘संभाजीराजे व आंबेडकर मराठा समाजाच्या न्यायहक्क्यासाठी एकत्र येत असतील. तर त्याचे आम्ही स्वागत करुच. पण जर राजकीयदृष्ट्या कोणाला फायदा होत असेल तर दोन्ही नेत्यांनी सावध भूमिका घ्यावी, असं ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे,’ असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत Metro 2A आणि Metro 7 ची आज होणार चाचणी

Central Vista; सेंट्रल व्हिस्टाचं बांधकाम रोखण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार