in

कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत न्यायालयाची नोटीस

कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले ८३ वर्षीय स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनावर एनआयएला नोटीस बजावत त्यांना उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला १५ मेपर्यंत स्वामी यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

स्वामी यांना ऑक्टोबर २०२० मध्ये अटक झाली. ते सध्या तळोजा कारागृहात असून व्याधिग्रस्त आहेत. त्यांना नीट ऐकूही येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची तात्पुरती जामिनावर सुटका करावी, असं स्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, एनआयकडून यावर सूचना घ्यावी लागेल. वैद्यकीय जामिनासंबंधी अपील करण्यासाठीची १५२ दिवसांची वैधानिक मुदत उलटल्यानंतर स्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. स्वामी यांनी नियमित जामिनासाठीही एक याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने १४ जूनला सुनावणी ठेवली आहे, असं एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या

‘नितीन गडकरींकडे आरोग्य खात्याचा अतिरिक्त कार्यभार द्या’; भाजपा खासदाराचा घरचा आहेर