in

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३७ वा टप्पा पूर्ण !

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे ऐतिहासिक वारसा इमारती जवळील मेट्रो-३ च्या पॅकेज-१ चे ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. सूर्या-२ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाऊन लाईन मार्गाचा ५६९ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ४१८ रिंग्जच्या सहाय्याने १०६ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणासह पॅकेज-१ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाऊन लाईनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्च गेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश असून आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत सहा भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले.मेट्रो-३ प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ९५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chaitra Yatra: पंढरपुरातील चैत्र यात्रा रद्द

RCB vs RR | राजस्थानला तिसरा धक्का, डेव्हीड मिलर आऊट