in

‘लागिरं झालं जी’ फेम शितलीच्या जबरदस्त डान्सवर नेटकरी फिदा

अभिनेत्री शिवानी बावकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शिवानीने शीतलची भूमिका साकारली होती. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत असलेली शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. नुकतंच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचा एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवानीने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शिवानी बावकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशालीने गायलेल्या ‘खो गयी मैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात तिने जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी शिवानीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्लाझो परिधान केला आहे. ती या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या डान्स मूव्हचे आणि सौंदर्याचे कौतुक करत आहे. यावर नेटकऱ्यांनी फायर, हार्ट यासारख्या इमोजींचा पाऊस पाहायला मिळत आहे.

शिवानी बावकर ही सध्या ‘कुसुम’ या मराठी मालिकेत काम करत आहे. ही मालिका सोनी मराठीवर प्रक्षेपित होते. यात शिवानीची भूमिका प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा अभिनयाचे चाहते फारच कौतुक करताना दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्या चव्हाणांना अब्रुनुकसानीची नोटीस, ‘डान्सिंग डॉल’ शब्दावर अमृता फडणवीसांचा आक्षेप

Maharashtra Corona | महाराष्ट्रात 40 हजार नवे कोरोनाबाधित