in

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे ही जोडी ‘जस्ट फ्रेंड’ नामक ऑडिओ ड्रामा स्टोरीटेलमध्ये आपल्याला एकता येणार आहे. ‘जस्ट फ्रेंड’ असताना एकमेकांसोबत कसं रहावं? आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात? या सर्व प्रश्नांची उत्तरे यामधुन मिळणार आहेत.

‘जस्ट फ्रेंड’ या नव्याकोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या निमित्ताने सर्वांना वेड लावणारी ललित प्रभाकर गौतमी देशपांडे ही क्युट बबली जोडी एकत्र आली आहे. मैत्री, मैत्रीतलं नातं, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अश्या अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्रांचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. या दोन्ही व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत असे ‘जस्ट फ्रेंड’ स्टोरीटेलवर ऐकताना जाणवत राहते.

लेखिका गौरी पटवर्धन यांनी स्टोरीटेलसाठी लोकप्रिय अभिनेते ‘सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांच्या आवाजामधील लोकप्रिय ‘हौस हजबंड’, मृण्मयी गोडबोले स्वानंदी टिकेकरसह ‘फिरंग’, तसेच नेहा अष्टपुत्रेसह ‘चिडका बिब्बा’, ‘रोकू बंद पडला’, ‘अळी आणि कोळी’, शेतातून ताटात, कल्पेश समेळसह मंकूचं झाड’, सौरभ गोगटेसह ‘डॉल हाऊस’, स्वप्नाली पाटीलसह ‘तो ती आणि तिचा तो’, मेघना एरंडेसह ‘बाहुलीचं लग्न’, मिशन हिमालय, ‘ऍडव्हेंचर काश्मीर’ इत्यादी ऑडिओ सिरीज लिहिल्या आहेत तर लेखिका सायली केदार यांनी नुकतीच सुपरहिट झालेली अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या कल्पक वाचिक अभिनयाने नटलेली ‘केस ००२’ व अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह ‘केस ००१’ अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या आवाजातील ‘झोलर’, स्वप्नाली पाटील, सिध्दार्थ चांदेकरसह ‘चित्रकथा’ स्वानंदी टिकेकर, अंगद म्हैसकर, सायली पाठक, पुष्कराज चिरपुटकरसह ‘टू टायमिंग’ भाग १ व २ चे लेखन केले आहे. स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या या दोन प्रतिभावंत लेखिका ‘जस्ट फ्रेंड’ नव्या ऑडिओ सिरीज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्याने एक अभिनव कलाकृतीची निर्मिती झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर

‘भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या’, शेलारांनी राऊतांना घातली युतीची साद