in

ललित प्रभाकरचं ‘सनी’ सरप्राईज

अभिनेता ललित प्रभाकर लवकरच एका नव्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. ललितच्या या नवीन चित्रपटाचं ‘सनी’ असं नाव आहे. अभिनेता हेमंत ढोमे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.अभिनेता ललित प्रभाकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सनी’ या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं आहे.

पोस्टर शेयर करतात सर्वजण ललितला शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटाच्या भेटीसाठी आपल्याला अजूनही थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 2022मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे आपल्याला ललितला नव्या रुपात भेटण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

ललितसोबत कोण अभिनेत्री असणार किंवा चित्रपटात अन्य कोणते कलाकार असणार याबद्दल अजूनही काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाहीय. मात्र ललितसाठी त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. सध्या ललित भाडीपाची ‘शांतीत क्रांती’ या सिरींजमध्ये व्यग्र आहे. या सिरीजची बरीच चर्चासुद्धा सोशल मीडियावर सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग यांना ५० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी

हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग