in

आशा वर्कर्सच्या योग्य मागण्या मान्य करू, त्यासाठी आंदोलन नको – राजेश टोपे

rajesh tope

“आशा वर्करबाबत माझी युनिअनसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांच्या सर्व मागण्यापूर्ण करण्यात येतील त्यामुळे आंदोलनाचा प्रश्नच उद्भवत नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी माध्यमांना दिली. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राज्य आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं तसंच इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा आहे असं शरद पवारांच्या आवाहनानंतर अनेक साखर कारखाने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत आहेत. केंद्राने अधिकाधिक लस द्यावी. आतापर्यंत आपण तीन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे, १३ कोटी लसीकरण करणे बाकी आहे. उर्वरित राहिलेले लसीकरण देखील तीन ते चार महिन्यात पूर्ण करू. मात्र आपल्याला केंद्र सरकारने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे,” असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

काय आहेत आशा वर्कर्स मागण्या ?
रोज 300 रुपये मानधन मिळावं.
आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत.
आशां ना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत.
तब्बल 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.
अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही.
नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Australia science | ऑस्ट्रेलियन विद्यार्थीने कोळंबीच्या कवचांपासून बनविलेले मजबूत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक

Eknath Shinde| अभिनेता मयुरेश कोटकरला पोलिसांकडून अटक