in

गर्लफ्रेंडला भेटायचंय, गाडीवर कुठला Sticker लावू?; वाचा मुंबई पोलिसांनी दिलेले भन्नाट उत्तर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले असून वाहनांवरही त्यांच्या वापरानुसार लाल, हिरवा आणि पिवळा स्ट्रीकर लावून वर्गिकरण केलं जात आहे. यासाठी मुंबई पोलीस जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. मिम्सच नाहीत तर मुंबई पोलिसांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवरही पोलीस अगदी भन्नाट उत्तर देताना दिसत आहे. आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासंदर्भात एकाने विचारलेल्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी अगदी भन्नाट उत्तर दिलं असून त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

याच नव्या नियमाच्या पार्श्वभूमीवर अश्वीन विनोद नावाच्या एका मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन एक प्रश्न विचारला. “माझ्यागर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी मी कोणता स्ट्रीकर गाडीला लावला पाहिजे?, मला तिची खूप आठवण येत आहे,” असं ट्विट विनोदने मुंबई पोलिसांना टॅग करुन केलं.

यावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही गोड बोलून विनोदची फिरकी घेतली. “आम्हाला ठाऊक आहे सर हे तुमच्यासाठी अत्यावश्यक काम आहे, मात्र दुर्दैवाने हे आमच्या अत्यवश्यक कामामध्ये किंवा आपत्कालीन कामांमध्ये येत नाही. दोघं प्रेम करणारे एकमेकांपासून दूर असतील तर प्रेम आणखी वाढतं. त्यामुळेच तुमची प्रकृती सध्या अगदी उत्तम आहे. तुम्ही दोघे आयुष्यभर एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही ते वाक्य केवळ वाक्यप्रचार म्हणून वापरलं आहे,” असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेंज नसल्यास Vodafone च्या ग्राहकांना Lockdown मध्ये घराबाहेर पडण्यास परवानगी?

West Bengal Election | निवडणुकीत प्रचार यात्रा रद्द करण्याचे कार्ड गाजतेय; आता पंतप्रधानांचा दौरा रद्द