in

लॉकडाऊन करा; कोरोना परिस्थितीवरून कोर्टाचा केंद्राला सल्ला

देशभरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण रोज आढळून येत आहेत. शनिवारी देशामध्ये कोरोनाचे चार लाखांहून अधिक रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. देशातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेक सल्ले दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिलाय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने लस खरेदी करण्यासंदर्भातील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा असंही म्हलं आहे. असं केलं नाही तर सर्वाजनिक आरोग्याच्या अधिकारावर गदा येईल, हे संविधानातील कलम २१ चं उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या सामाजिक आणि वंचित आर्थिक घटकातील लोकांवर याचा विशेष परिणाम होणार आहे त्यांना गरजेच्या वस्तू मिळतील यासाठी खास व्यवस्था करण्यात यावी असं न्यायालयाने म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

vaccination shortage | सोमवारी ‘या’ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही

ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असल्यास काय करावं लागणार?