in ,

दिल्लीतील लॉकडाउन वाढवला; कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका आठवड्याचा लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं दिसताच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे.

कोरोनाच्या तीन लाटांचा सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. सुरुवातीला लॉकडाउन न करण्याची केजरीवाल सरकारची भूमिका होती. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता.

दरम्यान, पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. दिल्लीत करोनाचा कहर सुरू असून, त्यामुळे ६ दिवसांचा लॉकडाउन लागू केला होता. आता लॉकडाउन पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ही दरात घसरण झाली असून, दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवताना दिसत आहे,” असंही केजरीवाल म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’, गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

West Bengal Elections | तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचे कोरोनामुळे निधन