in

Lockdown | लॉकडाउन पुन्हा वाढणार पण…

महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. कोरोना संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

शिथिलता निश्चित द्यायची आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत चर्चा सुद्धा झाली आहे. पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. असे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले.

तर आता पर्यत लॉकडाऊन कमी करण्याचा किंवा नियम शिथिल करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आहे. काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत असल्याने ही चिंतेची बाब असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mucormycosis | आता ब्लॅक फंगसच्या उपचारासाठीचे इंजेक्शन ‘या’ किंमतीत मिळणार

cabinet meeting : चंद्रपुरातील दारूबंदी उठवली… जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय