in ,

Lockdown | जाणून घ्या मुंबई महानगरक्षेत्रात आजपासून काय सुरू अन् काय बंद

कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने कमी होऊ लागल्याने १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यांत १ जूनपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांनी याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर केली. आता येथे दुपारी २ वाजेपर्यंत मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून सर्व दुकाने सुरू राहतील.

मुंबईत दुकानांसाठी वेळापत्रक जाहीर
मुंबईतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील दुकाने खुली
ठाणे जिल्ह्यातील त्या-त्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापना आणि उद्योग सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

नवी मुंबईमध्येही मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून इतर सर्व एकल दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुुरू ठेवण्यात येणार आहेत.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांबाबत आदेश काढले नव्हते. त्यामुळे व्यापारी, दुकानदार व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

काय बंद | मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल, व्यायामशाळा, चित्रपटगृह

काय सुरू | सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, मद्यविक्री, ज्वेलरी, हेअर सलून, सर्व प्रकारची दुकाने, हार्डवेअर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार; स्वामी रामदेवांचा मोठा दावा

World Milk Day | जागतिक दूध दिनानिमित्त दुधाचं महत्त्व आणि फायदे