in

पुण्यात लॉकडाऊनला सुरुवात… पेठा पडणार ओस!

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या आदेशानुसार पुण्यात आजपासून संध्याकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील अनेक दुकानं संध्याकाळी सहा पर्यंत बंद झाल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उर्वरित वेळेत जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. एरव्ही गर्दीने भरलेल्या पेठा लवकर ओस पडल्याचे चित्र होते. पुण्यात सात दिवस परिवहनच्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक देखील बंद असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“पश्चिम बंगाल निवडणूक हारल्यानंतर ममता दीदी मतदारसंघाच्या शोधात असतील”

Axar Patel : आयपीएल आधीच अक्षर पटेल ‘पॉझिटिव्ह’