in ,

लॉकडाउनमुळे पुन्हा बेरोजगारी, भूकबळी येईल – संजय निरुपम

चुकीचं नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता,” असं काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले आहेत.

“काँग्रेस पक्षाचे नेते जे सरकारमध्ये आहेत त्यांना लॉकडाउनचा विरोध करण्यासाबंधी बोलणार आहे, लोकांमध्ये लॉकडाउनची खूप भीती आहे. बेरोजगारी, भूकबळी पुन्हा येईल अशी भीती त्यांना आहे,” असं संजय निरुपम यांनी सांगितलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र लॉकडाउनला जाहीर विरोध केला आहे. आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योजकांनीही लॉकडाउन पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम देखील लॉकडाउनवरुन संताप व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी लसीकरण नव्हतं. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करुन जास्तीत जास्त लसीकरण केलं पाहिजे. मिशन टेस्टिंग बकवास आयडिया आहे. तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाउन नको,” असं स्पष्ट मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाउन; पालकमंत्र्यांचं विधान

छाया साखरे यांचा राज्यस्तरीय ‘आय टी गोल्डन ग्लोब अवॅार्ड’ने सन्मान