in

सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा देणारा आजोबा गणपती तुम्हाला माहितीय का?

लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यपूर्वकाळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती होय. या गणपतीने 136 वर्ष पूर्ण केले आहेत. आज मोठ्या भक्तीमय वातावरणात या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

लोकमान्य टिळक सोलापूरला आल्यावर त्यांचे वास्तव्य आप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असायचे यावेळी शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती आणि गणेश उत्सव समारंभात पानसुपारी कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येते.

स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते.त्याप्रमाणेच आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता वाढवणारे कार्यक्रम हे मंडळ राबवित आहे. संपूर्ण वर्षभर सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यात या आजोबा गणपती मंडळाच्या माध्यमातून संपर्क सुरू असतो.राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक आणि क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांना सातत्याने प्रेरणा देण्याचे कार्य आजोबा गणपती मंडळ करत असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Kalyan East

Roha Raigad