in ,

Lokshahi Impact | कुस्तीगीर महिलेला सरकारची मदत… कोरोनामुळे रोजंदारीची वेळ

कोरोना महामारीमुळे राज्यात कुस्तीपट्टूसमोर रोजंदारीची वेळ असल्याची बातमी लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल तिला मदत मिळवून दिली आहे.

सांगलीतील तुंग येथील अनेक पदकांसह राष्ट्रीय खेलो इंडिया पदक विजेती संजना बागडी यांना लॉकडाऊनची झळ बसलीय.त्यांना चक्क  ३०० रूपयाच्या रोजंदारीवर कामासाठी इतरांच्या बांधावर जावे लागत आहे. यामुळे मल्लांवर रोजंदारीची वेळ आलीय ? मल्लांसमोर खुराकाचा प्रश्न उभा राहिला आहे ? तसेच मल्लांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रश्न विचारत ही बातमी लोकशाही वर प्रदर्शित करण्यात आली होती.

या बातमीची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आणि आज मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे या कुटुंबाने आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, 10 हजार 219 नवे रुग्ण

‘ते’ साडेसहा हजार कोटी मराठा समाजाला?