in

Lokshahi Impact: लोकशाहीच्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाला आली जाग

महेंद्र वानखेडे | मीरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. लोकशाहीने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनावर ताशेर ओढले आहेत. या बातमीनंतर आता महापालिका प्रशासन जागे झाले असून शहरातील १ हजार १७५ इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत.

मीरा भाईंदर शहरातील एकूण १६ इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आले आहेत.त्यातील 3 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात असली आहे. तर 2 इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. तसेच महानगरपालिकेने १ हजार १७५ इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. इमारतीना स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली असून इमारतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही पालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे बंधनकारक

महाआवास अभियानाअंतर्गत 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश