in

Maharashtra Cabinet Meet | ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार… खरीप हंगामात शेतकऱ्यांना पाठबळ

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली असून सहा मोठे निर्णय झाले आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कारचा भीषण अपघात! दोघे ठार , तर चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू

शेतकऱ्यांनो, १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा कृषि विभागाचे आवाहन