in ,

Maharashtra Corona Update: चोवीस तासांत ६७, १६७ रुग्ण.. तर ६३,००० कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.

मुंबई गेल्या 24 तासात 5,867 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 5,867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccine: सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; पाहा लसींचे ‘रेटकार्ड’

Remdesivir in Maharashtra: अखेर ज्यादाचे रेमडेसिवीर महाराष्ट्रात येणार… केंद्र सरकारचा निर्णय