in

Maharashtra Corona : दिलासादायक, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा घटला

एप्रिल महिन्यात थैमान घातल्यानंतर आखेर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा घटल्याचे चित्र आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात २४ हजार १३६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत रोज आढळणाऱ्या ५० ते ६० हजार रुग्णांच्या संख्येत आता निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे.

सध्या राज्याचा रिकव्हरी रेट मागील महिन्यातील ८२ टक्क्यांवरून थेट ९२.७६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आकड्यांमुळे राज्यातली आत्तापर्यंत पॉझिटिव्ह झालेल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी ५६ लाख २६ हजार १५५ पर्यंत गेली आहे. मात्र, त्यातले फक्त ३ लाख १४ हजार ३६८ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.

दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर आलेला असताना मृतांची संख्या मात्र जास्तच आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात कोरोनामुळे ६०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ९० हजार ३४९ झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#CycloneYaas : वादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा नियंत्रण कक्षातच मुक्काम

सुबोधकुमार जयस्वाल यांची CBI संचालकपदावर नियुक्ती