in

Maharashtra Corona Update: रिकव्हरी रेट वाढला… राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही घटली!

राज्यभरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र असून महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे रुग्णसंख्या घटल्याचे चित्र राज्यभरात आहे. दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

मात्र, याचवेळी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मात्र मृतांच्या संख्येत आज वाढ झाली असून मागील चोवीस तासात राज्यात ४७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात होणार नाही

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत