in

Maharashtra Corona | राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून महामारीची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. सध्या राज्यभरात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यानंतर राज्यात संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त आहे. मात्र गेल्या चोवीस तासांत राज्यात 8 हजार 129 नवे कोरोनाबाधित अढळले असून 200 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर, दिवसभरात 14 हजार 732 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत आठ हजार 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 200 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 14 हजार 732 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 54 हजार 003 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 1.9 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण 1 लाख 47 हजार 354 इतकी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SEBC प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Online Education | ”मोदी जी नेटवर्क फक्त डोंगरावर येते”,फोपसंडी गावच्या तुषारचे थेट पंतप्राधानांना पत्र