in

चिंता वाढली… देशातील सर्वात जास्त बाधितांमध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्हे

भारतात गेल्या २४ तासांत ५६ हजारांवर करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान ३७,०२८ जण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील प्रामुख्याने दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहरांचा समावेश आहे. या आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६५ टक्के आहे.

यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के, पंजाबची ८.८२ टक्के, छत्तीसगड ८ टक्के, मध्य प्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडू २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.०४ टक्के इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस घेतल्यानंतरही रामदास कदम कोरोना पॉझिटिव्ह

घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मोदी सरकारचा विरोध