in

Maharashtra Corona: तांडव सुरूच… दिवसभरात ५०३ जणांचा मृत्यू, तर ६७ हजार ६३१ कोरोनाबाधित

राज्यभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून आज दिवसभरात ६७ हजार ६३१ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर, ४५ हजार ६५४ रुग्ण आज कोरोनातून बरे देखील झाले आहेत.

सध्या राज्यात १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे. सरकारकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र तरी देखली रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपुरात काढ्यासाठी लागली रांग… कोरोना बरा होत असल्याचा महिला डॉक्टरचा दावा

माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन