in

Oxygen Express | महाराष्ट्रासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस, विशाखापट्टणमहून धावणार

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी बैठक घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यानुसार रुग्णांसाठी ऑक्सिजन आयात देखील केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशात पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे.

देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याची योजना रेल्वेने आखली आहे. ही एक्स्प्रेस सुरळीत धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातून सोमवारी रिकामे टँकर विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला आणि बोकारोला रवाना केले जातील. या ठिकाणाहून हे टँकर आणि सिलिंडर ऑक्सिजन भरून महाराष्ट्रात येतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हॉट्सअॅप चाट बेतलं जीवावर… पोटच्या मुलींवर बापाने चालवला ट्रक

नागपुरात काढ्यासाठी लागली रांग… कोरोना बरा होत असल्याचा महिला डॉक्टरचा दावा