सध्या राज्यासह देशभरात कोरोना लसीकरण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. महाराष्ट्र देशभरात यामध्ये अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. याबाबतीत राज्यानं राजस्थानलाही मागे टाकलं आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 45 हजार 860 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं, तर राजस्थानात 55 लाख 82 हजार 872 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात 54 लाख 82 हजार 50, उत्तर प्रदेश 53 लाख 28 हजार 419 आणि पश्चिम बंगालमध्ये 50 लाख 91 हजार 103 जणांनी कोरोनाची लस घेतली. देशात ३१ मार्चपर्यंत लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ कोटी 39 लाख ८९ हजार 35 इतकी आहे, तर 90 लाख 65 हजार 318 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात 31 मार्च रोजी दिवसभरात 2 लाख 16 हजार 211 जणांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 91 हजार 573 लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस आणि 24 हजार 638 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली.
Comments
Loading…