in

ई – पास कसा काढायचा ? जाणून घ्या सविस्तर

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल.

जाणून घ्या ई – पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

● शासकीय कर्मचारी/ वैदयकीय सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्याना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही.

● मुंबई शहरांतर्गत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांकरिता प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही. सध्या कार्यान्वित असलेली कलर कोड पद्धती या पुढेही तशीच वापरात राहील.

● 21 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या अणि अत्यावश्यक कारणांस्तव बुहन्मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल.

● पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्‍तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.

● सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणवर क्लिक करा. अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्रे एका फाईलमध्ये एकत्र करा.

● फोटोची साईड 200 केबी पेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्तऐवजाची साईड 1 एमबी पेक्षा जास्त नसावी

● अर्ज सबमिट केल्यानतर, आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा.

● सबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.

● ई-पासमध्ये आपले वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.

● प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी / हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलीसांनी विचारले असता आपला ई-पास दाखवा. आपण पास प्रिंट करून त्यास आपल्या वाहनावर चिकटवू शकता.

● ई-पासची नक्कल प्रत बनवणे/ वैध तारखेनंतर अथवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश

दारूसाठी वणवण.. सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये ७ जणांचा मृत्यू!