in

महाराष्ट्राला 12 कोटी लसीची गरज; एकरकमी चेक देण्याची तयारी

महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात आतापर्यत १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाले असून 12 कोटी लसीची गरज आहे. त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे. उद्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय. यात महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे. साधारण जून-जुलैपासून लसीचा पुरवठा वाढेल. तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये असे त्यांनी म्हटले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CM Uddhav Thackeray live; 18 ते 44 नागरिकांचे लसीकरण करणार

PBKS Vs RCB: बंगळुरुसमोर विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य