in

Maharashtra Vaccination | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरण

देशात लसीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असतानाच राज्यातील अडीच कोटींहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अव्वल स्थान कायम राखलंय. सध्या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाशिम जिल्ह्यात धुवादार पाऊस

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जुलै महिन्यात