in

Maharashtra Unlock | आता लवकरच शुटिंग होणार सुरु

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनलॉकबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे. यामध्ये शुटींगवर सुद्धा बंदी आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या कित्येक मालिकांना शुटींगसाठी परराज्यात आपलं बस्तान मांडावं लागलं होतं.

मात्र परराज्यात काही दिवस शुटींग केल्यानंतर तिथेही काही मालिकांवर बंदी आली होती. म्हणूनच कित्येक मालिकांचं शुटींग बंद होतं. त्यामुळे सर्वच कलाकार चिंतेत होते. मात्र आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांत अनलॉकचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात 5 टप्प्यांत अनलॉक केलं जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Unlock : महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक केलेला नाही; वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचं स्पष्टीकरण!

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत घसरण