पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक वक्तव्य केलं आहे. नंदीग्राममध्ये माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. निवडणूक झाल्यानंतर त्या लोकांना सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच ममता यांनी दिला आहे. प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाला आणि तो भाजपच्या लोकांनी केला, असा दावा ममतांनी केला आहे. निवडणूक संपल्यानंतर कोणालाच सोडणार नाही. तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला खेचून आणणार, असं ममतांनी म्हटलं आहे.
आजपासून (गुरुवार) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. विविध जिल्ह्यातील ३० जागांसाठी मतदान होत आहे.
Comments
Loading…