in ,

ममता बॅनर्जींची मोठी घोषणा;सर्वांना मोफत लस देणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण दिनाजपूर भागातल्या एका सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देणार असल्याची घोषणा केली आहे. ५ मेपासून राज्यात जे कोणी पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. दरम्यान ममता यांनी नुकतंच लसींच्या नव्या किमतींवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.“भाजपा कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असं ओरडत असतं. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचं वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. यासाठी खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी. असे त्यांनी म्हटले. दरम्यान ममता यांनी लसीच्या एका किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं होत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election | निवडणुकीत प्रचार यात्रा रद्द करण्याचे कार्ड गाजतेय; आता पंतप्रधानांचा दौरा रद्द

ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं निधन