in ,

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींएवजी ममता दीदी, पश्चिम बंगाल सरकारचा भाजपला दणका

कोरोना लस घेतल्यानंतर कोविड अॅपवर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत असल्याने भाजपविरोधी राज्यांनी याला विरोध दर्शविला आहे. काँग्रेसचे सरकार आसणाऱ्या छत्तीसगड राज्यानंतर आता पश्चिम बंगाल राज्याने देखील लस घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविला आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या या निर्णयाने भारतीय जनता पक्ष मात्र चांगलाच संतापला आहे.

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढून त्याजागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र छापणे हा पंतप्रधानपदाचा अवमान आहे. असे वक्तव्य भाजप प्रवत्ते समीक भट्टाचार्य यांनी केले असून तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल एक स्वतंत्र देश असल्यासारखा वागत आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारे वर्तन करीत असल्याची टीका भट्टाचार्य यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘चिमणी गिधाडांना भारी पडली’

Shivrajyabhishek | ‘मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’ रायगडावरून संभाजीराजेंचा इशारा