शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत तणावाची स्थिती असताना इस्रायली दुतावासाजवळ स्फोट झाला. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालचा दौरा रद्द करावा लागला. दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केलं. ”दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला.” असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं.

तसेच, ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचं आहे. असं देखील यावेळी मोदी म्हणाले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं आहे.

या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.” असं सांगितलं होतं. तसेच, शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असंही मोदी म्हणाले होते.

  • प्रजास्ताक दिनाला महिला पायलट्सनी भारताची शान वाढवली. अशा प्रकारचे कौतुक गावातील महिलांचेही व्हायला हवे
  • क्षेत्र कुठलंही असो देशाच्या विकासात महिलांची भागिदारी वाढली आहे
  • कोरोनावरील स्वदेशी लसींमुळे आत्मविश्वास वाढला आहे. जगभरातून भारताचं मोठं कौतुक होतंय
  • जगात सर्वात वेगाने भारताने १५ दिवसांत ३० लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली
  • २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाच्या झालेल्या अपमानाने देश दुःख झाला
  • पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दल नक्की जाणून घ्या, कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करता. सर्वांना त्यातून प्रेरणा मिळालेल
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी झाली. ऑस्ट्रेलिया भारतीय संघाने मिळवलेला विजय कौतुकास्पद
  • मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू झालं