in

दोन्ही राजे अखेर एकत्र; मराठा आरक्षणप्रकरणी पुण्यात दोघांमध्ये बैठक

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संभाजीराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असून यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. यानंतर आज पुण्यात ही भेट झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर छत्रपती उदयजनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांची पुण्यात भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अन्यथा आम्ही मानवी भिंत उभी करून जलसमर्पण करणार : शेतकऱ्यांचा इशारा

चीनच्या वुहान लॅबमध्ये सापडली जिवंत वटघाटळं; व्हिडीओ झाला व्हायरल