भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सचिनला करोना व्हायरसची लागण झाली होती. मुंबईत परतल्यावर सचिनला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली. त्यामुळे तो डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते.
आता सचिनने डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले. सचिनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालोय. लवकरच ठीक होऊन मी परत येईन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत यासाठी मी सर्वांचे आभारी आहे.
Comments
Loading…