in

मुनमुन दत्ताने शेअर केले गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो

काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीताजी आणि टप्पू यांची खूपच जास्त चर्चा केली जाते. काला विश्वात खऱ्या आयुष्यात अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. सोशल मीडियावरही दोघांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आलंय. मुनमुन आणि राजच्या अफेरच्या चर्चांनंतर जेठालालला मोठं दु:ख झालं असेल असं म्हणत सोशल मीडियावर मीम्स देखील व्हायरल होवू लागले होते.

‘तारक मेहता…’मालिकेत जेठालाल बबीताजीला पसंत करत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर जेठालालच्या मुलाची म्हणजेच टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट बबीचताजी म्हणजेच मुनमुन दत्ताला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. राज मुनमुनपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. नुकतेच मुनमुन दत्ताने आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

मुनमुन दत्ताच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ‘टप्पू कुठे आहे ?’ असा सवाल विचारत मुनमुनवर निशाणा साधला. तर एक युजर म्हणाला, “बबीता तेजेंद्र गडा” दुसऱा युजर म्हणाला, “तुम्ही जेठालालसोबत चुकीचं केलंत”. आणखी एक युजर म्हणाला, “तुमच्या चर्चा रंगत आहेत सध्या बाजारात”
अनेक नेटकऱ्यांनी मुनमुनला टप्पू आणि तिच्या रिलेशनशिपवरून ट्रोल केलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Forecast : पुण्याला पुढील पाच दिवस ऑरेंज ॲलर्ट

वर्ध्यात कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून लिपिकाची आत्महत्या