गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तर यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थींनकडून परीक्षा घेण्याबाबत सतत आंदोलन केली जात होती. त्यामुळे २१ मार्चला एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. तसेच येत्या रविवारी ११ एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
तसेच परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच शनिवार आणि रविवार या विकेंड दिवशी कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत लॉकडाऊनदरम्यान एमपीएससी परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी असे सरकारला आवाहन केले आहे. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. अशी मागणी त्यांनी या ट्विटमध्ये केली आहे.
Comments
Loading…