in

VIDEO: आला रे आला… मुंबई इंडियन्सचं नवं Anthem

IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत आहे. युएई येथे पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओत जसप्रीत बुमराह, ईशान किशन ते हार्दिक पांड्या असे संघाचे स्टार खेळाडू थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओत नीता अंबानी यांनी मराठीत “महाराष्ट्रातील प्रत्येक फॅमिलीचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स” असे म्हटले आहे.

चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, बुधवारी आयपीएल आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cabinet meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; चक्रीवादळांच्या उपाययोजनांसाठी कोकणला 3 हजार कोटी

देशात डेंग्यूचं थैमान!