in ,

मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल 45 हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे.

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरात 45 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढा आतापर्यंत सुरु आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर 2020 अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत होते. त्यानंतर मात्र नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

World Test Championship | टीम इंडियाला 30 सदस्यांसह इंग्लंडला जाण्याची परवानगी

राज्यात लॉकडाउन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक