in

Mumbai Local | सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी काही भागात अजूनही करोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार नाही असा निर्णय राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

राज्यात रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार नसून मुंबईची लोकलही सध्या सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार असून यामध्ये लॉकडाऊनविषयी निर्णय घेतला जाईल अशी माहिती वडेट्टवीरांनी दिली आहे.

लोकलसेवेबाबत विचारले असता १ जूनला मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले तरी पुढचे किमान १५ दिवस सर्वसामान्यांसाठी लोकल खुली केली जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी करोना संपलेला नाही. त्यामुळे लोकलबाबत तूर्त निर्णय घेतला जाणार नाही.

लोकल सर्वांसाठी खुली केल्यास पुन्हा गर्दी होईल हे निश्चित आहे. म्हणून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यावरच त्याबाबत विचार केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा आहे. ती यापुढेही कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना रुग्णाला राहायला जागा मिळत नसल्याने मालवाहू रिक्षात महिला क्वारंटाईन

संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला, ते सांगत नाही : चंद्रकांत पाटील