मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल पुन्हा बंद शक्यता आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईची लोकल बंद होणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक विधान ही केले आहे.
राज्यासह मुंबई आणि उपनगरात कोरोना रुग्णांचा उद्रेक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आधीच कडक निर्बंध व लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यात आता कदाचित मुंबई लोकल बंद केल्या जाऊ शकतात.
लोकल सुरु करावी किंवा बंद करावी का? किंवा मागच्या वेळेस जसा काही निर्बंध घातला होता, त्याबाबतचा विचार केला जाऊ शकतो. आम्ही रेल्वेशी संपर्क केला. रेल्वे प्रशासन त्यावेळी वारंवार नकार देत होते. मात्र, लोकांचा रोजगार बुडत असल्याने आपण लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. आता रेल्वेत गर्दी आहे. याशिवाय संख्याही वाढत आहे. त्यामुळे याबाबत नक्की निर्णय घेतला जाईल, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
Comments
Loading…