in ,

Mumbai Lockdown | शेवटी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; पालकमंत्री अस्लम शेख

शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत आहे, अशातच मुंबईत लॉकडाउन लावयाची कि नाही यावर मुख्यमंत्र्यांनमध्ये बैठक सुरु आहे. यासंदर्भात आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली तर गरिबांना किमान पैसे द्यावे लागतील किंवा काहीतरी त्यांच्यासाठी करावं लागणर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत हॉटेल आहेत, त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी, अनेक कारखान्यात काम करणारे मजूर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आज बैठक होणार आहे, कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे, आपण सगळ्या सुविधा वाढवू शकतो परंतु आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कसा करायचा? मुंबईची परिस्थिती गॅससारखी झाली आहे, वेळीच रोखलं नाही तर कोरोनाचा स्फोट होईल अशी भीती पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राजकारण नको – महापौर