in

मुंबई पोलिसांनी पुन्हा जिंकली मनं! घरीच वाढदिवस साजरा करणा-याला पाठवला केक

मुंबई पोलीस त्यांच्या सोशल मिडीयावरील हटके उत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी एका महिलेच्या घरी चक्क वाढदिवसाचा केक पाठवला आहे. मुंबईच्या रहिवासी असलेल्या समिता पाटील यांचा काल वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणी त्यांना पार्टी मागत होत्या. मात्र समिता यांनी त्यांना लॉकडाऊन असल्याने घरातच राहायचा सल्ला दिला. त्याबद्दल त्या मुंबई पोलिसांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

समिता यांनी हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमैत्रिणींनी समिता यांना पार्टी मागितली. त्यावर समिता यांनी “लॉकडाऊन आहे, त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा” असं उत्तर दिलं. आपल्या ह्या गप्पा त्यांनी मुंबई पोलिसांसोबतही शेअर केल्या.

त्यावर मुंबई पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्याकडे त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. तसंच जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं कौतुक करणारा एक मेसेजही पाठवला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs MI: पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन