in

Mumbai Sakinaka Rape : आरोपींना कठोर शिक्षा करणार – गृहमंत्री

‘साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस खात्याला सूचना दिल्या आहेत, की या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ते शोधा म्हणून. वेळोवेळी मी या प्रकरणाची सर्व माहिती घेत आहे’, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररित्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असा अहवाल यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Sakinaka Rape | मुंबईत ‘निर्भया’ची पुनरावृत्ती; अत्याचार झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू

Mumbai Rape case | महाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका – चित्रा वाघ